अकोलेकरांना दिलासा! दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरु राहणार

corona akola
corona akola

अकोला: जिल्हयात कोविड रुग्णांचा (COVID-19) पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सीजन बेडची (Oxygen) उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणा-या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेवून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरोना पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध (Lockdown) शिथिल केले आहेत. त्यामुळे आता सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने सुरु राहणार आहेत. लॉकडाऊनची निर्बंधे काही अंशी शिथिल झाल्याने अकोलेकरांना (Akola) दिलासा मिळाला आहे.(Akole: Shops will be open from 7 a.m. to 2 p.m.)

अकोला महानगरपालिका तसेच जिल्हयातील शहरी व ग्रामिण भागातील बिगर अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरु राहतील. मात्र शनिवार व रविवार पुर्णत: बंद ठेवावे लागणार आहेत.  भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, दुग्ध व दुग्ध जन्यपदार्थ विक्री सकाळी 7 ते 2 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत सुरु राहतील. कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती औजारे व शेतातील उत्पादनांशी संबधित दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3, सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्त संस्था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, विमा, पोस्ट पेमेंट बँका व आर्थीक बाबींशी संबधित असलेल्या सर्व वित्तीय संस्था सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत सुरु राहतील. 

हे देखील पाहा

रेस्टारंट व भोजनालयांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत फक्त होम डिलिव्हरी करता येईल. याशिवाय सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत दारू विक्री करता येणार आहे. अकोला महानगरपालिका व जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागातील सिएससी सेंटर्स सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येणार आहेत. दुकानांना पुरवठा केल्या जाणा-या वस्तूंच्या वाहतूकीवर निर्बंध नाहीत.

मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. दुपारी 3 वाजेनंतर कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय घराबोहर पडण्यास पुर्णत: बंदी असणार आहे. सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगीचे पुर्णतः बंद राहतील. केशकर्तनालय, सलुन, स्पा, ब्युटीपार्लर संपुर्णतः बंद राहतील, शाळा महावद्यिालय, शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णतः बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास प्रतिबंध राहणार नाहीत.

स्वागत समारंभावर बंदी कायमच
सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालय हॉल हे पुर्णतः बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरुपात करावा. लग्नामध्ये मिरवणूक, बॅन्ड पथक यांना परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. लग्न समारंभाकरिता केवळ 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसचे ऑनलाईन औषध सेवा 24 तास कालावधीत सुरू राहतील.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com