क्या बात है : कोरोनाला रोखण्यासाठी डोंबिवली मधील सर्वपक्षीय राजकारणी एकवटले....

प्रदीप भणगे
सोमवार, 12 एप्रिल 2021

राज्यात एकीकडे कोरोनाच्या विषयावरून जोरदार राजकारण सुरू असताना डोंबिवलीतील स्थानिक राजकारणी मात्र त्याला अपवाद ठरल्याचे आज दिसून आले

डोंबिवली : राज्यात एकीकडे कोरोनाच्या Corona विषयावरून जोरदार राजकारण सुरू असताना डोंबिवलीतील स्थानिक राजकारणी मात्र त्याला अपवाद ठरल्याचे आज दिसून आले.

डोंबिवली शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि तोकडी पडणारी यंत्रणा पाहता या सर्वपक्षीय राजकारण्यांनी अखेर 'हम सब एक है' चा संदेश देत कोरोनाविरोधात दंड थोपटले आहेत.डोंबिवली मधील सर्वपक्षीय राजकारणी मंडळीनी  स्वखर्चाने डोंबिवलीकरांसाठी स्वखर्चाने वॉर रूम War Room तयार करण्यास सुरवात केली असून यातून नागरिकांना माहिती आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. All-party politicians in Dombivli came together to stop Corona

सध्या राज्यामध्ये कोरोनावरून प्रमूख पक्षांमध्ये मोठे राजकारण सुरू आहे. सध्याच्या कठीण प्रसंगात राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच चित्र दिसत आहे. परंतु सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवली नगरीने हे नकारात्मक Negative चित्र खोडून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दिवसेंदिवस खराब होणारी डोंबिवलीची परिस्थिती पाहता डोंबिवलीतील शिवसेनेचे Shivsena सदानंद थरवळ यांच्यासह काँग्रेस Indian National Congress पक्षाचे जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP नंदू मालवणकर, मनसेचे MNS प्रकाश माने, भाजपचे BJP नंदू परब आणि आरपीआयचे RPI किशोर तांबे यांनी एकत्रित येत आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत चर्चा केली आहे.

सध्या कोवीड पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ सुरू आहे. बेड कुठे मिळेल, इंजेक्शन कुठे मिळेल? प्लाझ्मा कुठे मिळेल? ऍम्ब्युलन्स कुठे मिळेल? कोवीड टेस्ट कुठे करायची? लसीकरण कुठे सुरू आहे? यांसारख्या असंख्य प्रश्नांनी डोंबिवलीकर सध्या हैराण झाले आहेत. याबाबत नेमकी कुठे माहिती मिळेल याचीच अनेकांना माहिती नसल्याने या डोंबिवली सर्वपक्षीय कोवीड वॉर रूम व मदत केंद्राची स्थापना करत असल्याचे सदानंद थरवळ यांनी सांगितले आहे. All-party politicians in Dombivli came together to stop Corona

यामध्ये डोंबिवलीकरांना आवश्यक असणारी सर्व महत्वपूर्ण माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही थरवळ म्हणाले. तर महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या एकत्रित राजकीय पुढाकाराचे स्वागत आणि कौतुकही केले आहे. आमची आज सकारात्मक चर्चा झाली असून महापालिका प्रशासनाने या सर्वांची मदत घेण्याचे निश्चित केल्याचेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणले आहे. 

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live