अरे बापरे.....अंबरनाथ रेल्वे स्थानकात सर्व प्रवाशांना मिळतोय प्रवेश

Ambarnath Railway Satation
Ambarnath Railway Satation

अंबरनाथ : कोरोनाच्या Corona वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन Lockdown जाहीर केला असून यामध्ये लोकल Local आणि बसने Bus सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बस आणि लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मात्र असं असलं तरी आज सकाळपासून अंबरनाथ Ambarnath रेल्वे Railway स्थानकात प्रवेश करताना कुणाच्याही ओळखपत्राची तपासणी केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. All Passengers getting entry at Ambernath railway station without Identity Card

अंबरनाथ रेल्वे स्थानकात तिकीटविक्री सर्रासपणे सर्वांना सुरू असून कुणाच्याही ओळखपत्राची तपासणी न करता सर्वांना सरसकट रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे. याबाबत अंबरनाथ रेल्वे स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांना विचारलं असता, राज्य शासनाकडून आम्हाला अद्याप अशा प्रकारचे कुठलेही आदेश मिळाले नसून १० वाजता डीआरएम ऑफिस उघडल्यानंतर याबाबतच्या सूचना आम्हाला मिळतील आणि त्यानंतर अंमलबजावणी केली जाईल, असं उत्तर त्यांनी दिलं.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com