पुणे शहरातील सर्व निकाल दुपारी 12 पर्यंत अपेक्षित 

पुणे शहरातील सर्व निकाल दुपारी 12 पर्यंत अपेक्षित 


पुणे - पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मतदान केंद्र आणि उमेदवारांची संख्या पाहता कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे. तर भोर मतदारसंघात सर्वाधिक मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी निकालाला थोडा वेळ लागण्याची शक्‍यता आहे. साधारपणे दुपारी बाराच्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 246 उमेदवार आहेत. शहरातील मतदानाचा टक्का घसरला आहे. तर ग्रामीण भागात मात्र मतदानाच्या टक्केवारी अधिक आहे. पुणे शहरातील कसबा पेठ, वडगावशेरी, पर्वती, हडपसर, पुणे कॅंटोन्मेट, कोथरूड, शिवाजीनर आणि खडकवासला या आठ मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम येथे होणार आहे. तर पिंपरी - चिंचवड शहरातील तीन मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे होणार आहे. ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी संबंधित तालुक्‍याच्या ठिकाणी होणार आहे. 

मतमोजणीच्या सुरवातीला सकाळी सात वाजता प्रथम टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. टपाली मते मोजणीसाठी स्वतंत्र टेबल ठेवली जाणार आहेत. त्यानंतर आठ वाजता इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (इव्हीएम) मोजणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात 14 ते 22 टेबल ठेवण्यात आली आहेत. या टेबलवर एकावेळी एक इव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार आहे. 

कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कॅंटोन्मेट विधानसभा मतदारसंघात 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राची संख्या जास्त असल्याने याठिकाणी 23 फेऱ्या होणार आहेत. वडगावशेरी आणि पर्वतीमध्ये 22, कोथरुडमध्ये 21 फेऱ्या होणार आहेत. 

अशी होणार मतमोजणी 
विधानसभा मतदारसंघाचे नाव - मतदान केंद्रांची संख्या- टेबलांची संख्या - एकूण फेऱ्या 
जुन्नर - 356 - 14 - 26 
आंबेगाव - 336 - 14 - 24 
खेड - 379 - 14 - 28 
शिरूर - 389 - 14 - 28 
दौंड - 306 -14 - 22 
इंदापूर - 329 - 14 - 24 
बारामती - 368 - 14 - 27 
पुरंदर - 380 - 18 - 22 
भोर - 529 - 22- 25 
मावळ - 370 - 14 - 27 
चिंचवड- 491 -22 - 23 
पिंपरी - 399 - 20 - 20 
भोसरी - 411 - 20 - 21 
वडगावशेरी - 425 - 20 - 22 
शिवाजीनगर - 280 - 14 - 20 
कोथरूड - 370 - 18 - 21 
खडकवासला - 446 -20- 23 
पर्वती - 344 - 16 -22 
हडपसर - 454 -20-23 
पुणे कॅंटोन्मेंट - 274 - 14 - 20 
कसबापेठ - 279-14-20 


Web Title: All results in Pune city are expected by 12 noon
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com