31 डिसेंबरपर्यंत मुंबईतल्या सर्व शाळा बंदच राहणार, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता निर्णय

साम टीव्ही
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020
  • 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतल्या सर्व शाळा बंदच राहणार
  • मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांचे आदेश
  • मुंबईत 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार नाहीत
  • खबरदारी म्हणून मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश

मुंबईत सोमवारपासून शाळा सुरू होणार नाहीत... 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच राहणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिलेत. कोरोनाचा धोका वाढत असल्यानं खबरदारी म्हणून मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिलेत.

पाहा सविस्तर व्हिडीओ -

सोमवारपासून म्हणजेच 23 तारखेपासून मुंबईसह राज्यातील शाळा 9वी पासून ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू होणार होत्या. मात्र आता मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे सध्या मुंबईत तरी ऑनलाईनच शाळा भरणार आहेत.

सोमवारपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठीची तयारी पुण्यातील शाळांनी सुरू केलीय.

विद्यार्थ्यांची गर्दी टाळून शाळा भरवण्यात येणार आहे. एका दिवशी पन्नास टक्केच विद्यार्थी उपस्थित राहणार असून तीन ते चार तासच शाळा भरणार आहे. एका बाकावर वर एकच विद्यार्थी बसवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आलेले नाही. शाळांमध्ये सॅनिटायझेशन जोरात सुरू आहे. शाळेतील कर्मचारी आणि शिक्षकांचीही कोरोना चाचणी होणार आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live