चिखली नगरपालिकेतील विकास कामात १३४ कोटीं रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप

संजय जाधव
बुधवार, 5 मे 2021

चिखली नगरपालिकेच्या अधिकारी व अभियंता यांनी विकास कामाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे जिल्ह्याधिकारी यांच्याकडे केला आहे  

बुलढाणा : जिल्हात मागील वर्षापासुन अगोदरच कोरोनाने Corona थैमान घातला आहे. प्रशासन हतबल झाले आहे. तर दुसरीकडे चिखली Chikhali नगरपालिकेच्या अधिकारी व अभियंता यांनी विकास कामाच्या नावाखाली कोट्यावधीं रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने Swabhimani Shetkari Sanghatana एका निवेदनाद्वारे जिल्ह्याधिकारी यांच्याकडे केला आहे. Corruption in development work in Chikhali municipality 

चिखली नगरपालिकेच्या अंतर्गत शहरात १६ भूखंड आहेत. त्या भूखंण्डावर सौन्दर्यकरण सुशोभीकरण करण्याचे ठरविले होते. त्यानुसार शहरातील कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता चुपचाप टेंडर Tender काढून विश्वासातील ठेकेदारांना काम देत पूर्ण करून घेतल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. रेकॉर्डवर Record सर्व व्यवस्थितपणे दर्शविन्यात आले आहे.

ही सर्व माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी माहितीच्या अधिकारात काढली आहे. माहितीच्या आधारे ८ भुखंडवर जावुन प्रत्यक्षात पाहणी केली असता, कुठे थातुर मातुर कामे केली आहेत. लाखो रूपयाचे बिले Bills काढली गेली आहेत तर, काही ठिकाणी कामेच केली नसल्याचे निदर्शनात आले आहे. मात्र त्या कामाचेही बिले शंभर टक्के काढण्यात आली असल्याचे निदर्शनात आले आहे. Corruption in development work in Chikhali municipality

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

या सर्व विकास कामाची तातडीने उच्च स्तरीय चौकशी करावी आणि संबंधित अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच सर्व ठेकेदार यानी कामे न करता काढलेली लाखो रुपयाची बिले व निकृष्ट दर्जाची केलेल्या कामाची कोट्यावधी रुपयाची रक्कम वसूल करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्याधिकारी यांच्यकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा ऑनलाईन तक्रार केली आहे.  त्या तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी Chief Minister घेतली आहे. संबधित विभागाकडे चौकशीसाठी तक्रार वर्ग केल्याचे पत्र स्वभिमानी शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे यांना पत्राद्वारे कळविले आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live