COVID-19 Maharashtra: कोरोना रुग्णांच्या मृत्यूत घट

corona update 2.
corona update 2.

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची (Coronavirus) आकडेवारी कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) रुग्णसंख्या वाढत होती. परंतु, आता रुग्णसंख्या १५ हजाराच्या आसपास आली आहे. महाराष्ट्रात २१ जिल्ह्यात शिथिलता देण्यात आली आहे. परंतु, ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा दर २० टक्के आहे त्या जिल्ह्यात निर्बंध कायम आहेत. (Along with the active patient , the mortality rate also decreased)

मागच्या 24 तासात राज्यात 15,169 रुग्ण आढळले आहेत.  त्याचबरोबर, 29,270 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 57,76,184 रुग्ण आढळले असून 54,60,589 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 285 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात  96,751 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2,16,016 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,55,14,594 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका सांगितलेला आहे. त्यानुसार, राज्य सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्येने कळस गाठला होता. परंतु आता कमी होणारी रुग्णसंख्या दिलासा देत आहेत. (Along with the active patient , the mortality rate also decreased)   

Edited By : Pravin Dhamale 

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com