कोरोनाच्या नव्या परिणामांमुळे मोठी डोकेदुखी, बहुतांश कोरानाग्रस्तांना त्वचारोग

साम टीव्ही
सोमवार, 11 मे 2020
  • कोरोनाग्रस्तांवर त्वचारोगाचं संकट
  • जगभरात बहुतांश कोरानाग्रस्तांना त्वचारोग
  • कोरोनाच्या या नव्या परिणामांमुळे मोठी डोकेदुखी
  • सर्दी, ताप, खोकल्यासोबत आता त्वचारोगांचीही लक्षणं

आता बातमी कोरोनाच्या संकटात डोकेदुखी वाढवणारी. कारण, ताप, सर्दी, खोकला या कोरोनाच्या लक्षणात आणखी एका लक्षणाची भर पडलीय.  कोणतं आहे हे लक्षण.

जगभरात कोरोनामुळे हलकल्लोळ माजलेला असताना आता संशोधकांपुढे नवं टेन्शन उभं राहिलंय. कारण अनेक देशांतील कोरोनाग्रस्त रुग्णांना त्वचारोगाची समस्या निर्माण झालीय. त्यामुळे भारतातही कोरोनाग्रस्तांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येतंय. कोरोनाग्रस्तांच्या प्रकृतीच्या चढ-उतारांची नोंद ठेवली जातेय.

अर्थात, कोरोनाग्रस्तांना त्वचारोग होण्याचे प्रकार मुख्यत: युरोप खंडातील देशांमध्ये घडलेयत. यामध्ये

कोरोनाग्रस्ताच्या अंगावर लाल पुरळ येणे, शरीराच्या एखाद्या अवयवावर जखमेच्या व्रणासारखे डाग, त्याचप्रमाणे जखमा होणं, अंगावर टोकदार पुरळ येऊन खाज सुटणं अशी लक्षणं दिसू लागलीयत. सर्दी, ताप, खोकला अशा कोरोनाच्या लक्षणांमध्ये आता त्वचारोगाचीही भर पडलीय.

मुळात, कोरोनावर लस सापडलेली नसताना उपलब्ध औषधांच्या आधारे कोरोना बरा करण्याचे प्रयत्न जगभरात सुरूयत. त्यातच आता या त्वचारोगांच्या संकटामुळे कोरोनाग्रस्ताची जास्त काळजी घ्यावी लागतेय. कोरोनावर उपचार सुरू असल्याने औषधांच्या माऱ्यामुळे त्वचारोग होतायत का याचाही शोध घेतला जातोय. पण कोरोनाच्या चक्रव्यूहात या त्वचारोगाने नवं संकट उभं राहिलंय. भारतात अद्याप अशी प्रकरणं समोर आली नसली तरी, सावध राहायला हवं. येवढं मात्र नक्की.

Web Title - Along with cold, fever, cough, now there are also symptoms of vitiligo To corona patients


संबंधित बातम्या

Saam TV Live