पेट्रोल डिझेलसह आता भाजीपालाही महाग होणार!

साम टीव्ही
बुधवार, 1 जुलै 2020

डिझेल दरवाढीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढू लागलेत. वाहतूक खर्चात होणाऱ्या वाढीचा भार हा अंतिमत: शेतकरी वर्गासह कृषिमाल, भाजीपाला खरेदी करणाऱ्या शहरातील ग्राहकांवरच पडणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे

डिझेल दरवाढीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढू लागलेत. वाहतूक खर्चात होणाऱ्या वाढीचा भार हा अंतिमत: शेतकरी वर्गासह कृषिमाल, भाजीपाला खरेदी करणाऱ्या शहरातील ग्राहकांवरच पडणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील आठवडय़ात भाज्यांचे दर आणखी वाढतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 इंधनाचे दर सातत्याने वाढत राहिले, तर इंधनाशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यवसायांना त्याचा फटका बसण्याची दाट शक्यताय. याचा परिणाम थेट महागाईवर जाणवून सामान्यांचं बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जातेय. 

देशात दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्णवाढ होतेय. गेल्या देशात 24 तासात तब्बल  18 हजार 653 कोरोना रुग्णांची भर पडलीय. त्यामुळे देशात आता कोरोनाचे एकूण 5 लाख 85 हजार 493 रुग्ण असून त्यापैकी 3 लाख 47 हजार 979 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केलीय. सध्या देशभरात 2 लाख 20 हजार 114 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल एका दिवसात देशात 507 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर आतापर्यंत देशात एकूण 17 हजार 400 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय. 

त्यातच आता अशी महागाई झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान आता कोरोना कसे दिवस दाखवतो आणि पुढे काय काय सहन करावं सहन करावं लागतं हे येणारा काळच सांगेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live