कोरोना पासून बचाव करण्यासाठी घरातही मास्क लावण्याची गरज ....

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

रुग्ण कमी होत असले तरी सर्वांनी अजूनही तेवढीच काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. फक्त बाहेर निघताना नाहीच तर घरात राहिला तरी सुद्धा मास्क वापरा, असा सल्ला नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज नव्या रुग्णांची आणि बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी काहीशी  वाढली असली तरी कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय असे म्हणावे का ?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. Also apply a mask at home to protect against corona

तसेच सध्या राज्यात ब्रेक द चेन Break the chain अंतर्गंत अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे ही लाट ओसरली नसून हा निर्बंधांचा परिणाम आहे, असेसुद्धा अनेकांकडून सांगितले जात आहे. याच कारणामुळे रुग्ण कमी होत असले तरी सर्वांनी अजूनही तेवढीच काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. फक्त बाहेर निघताना नाहीच तर घरात सुद्धा मास्क वापरा, असा सल्ला नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल V. K. Paul यांनी दिला आहे.

त्यामुळे घरात असतानाही मास्क वापरावा लागणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ही धोकादायक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जेव्हा आपण घरात आपल्या कुटूंबियांन सोबत असतो. तेव्हा मास्क घातला पाहिजे. पाहुण्यांना घरी बोलवू नका, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. Also apply a mask at home to protect against corona

दरम्यान, केंद्र सरकार Central Government कोणत्याही परिस्थितीत लसीकरणाचा वेग कमी करणार नसल्याचं मत व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केला आहे. लोकांनी विनाकारण घाबरून जाता कामा नये, पाहुण्यांना बोलावू नका, लोकांत मिसळणे टाळा, रुग्णालयांनी ऑक्सिजन काळजीपूर्वक वापरावा, रुग्णालयात ऑक्सिजन गळती रोखणे आवश्यक. असा सरकारचा सल्ला आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live