70 हजार भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

रविवारपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. महिन्याचा चौथा शनिवार व रविवार असल्याने सलग सुटीचा योग साधत पर्यटक भाविकांची रविवारी मंदिरात मोठी गर्दी होती. मुख्य दर्शनरांग असलेल्या पूर्व दरवाजातून दिवसभरात १९ हजार १५६ भाविकांनी मंदिरात प्रवेश करत अंबाबाईचे थेट पेटीचौकातून दर्शन घेतले. पश्चिम दरवाजातून १४ हजार ७७६, दक्षिण दरवाजातून १३ हजार ८५४ तर उत्तर दरवाजातून १८ हजार १८४ भाविकांनी अंबाबाई मंदिरात प्रवेश केल्याची नोंद झाली. या सर्व भाविकांनी देवीचे मुखदर्शन घेतले

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी दिवसभरात ७० हजार भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद झाली. मेटल डिटेक्टर यंत्रणेनुसार भाविकांची नोंद घेण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता पारंपरिक लवाजम्यात अंबाबाईची सुवर्ण पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरातही दर्शनासाठी दिवसभर गर्दी झाली. सिंहासनारूढ रूपात तुळजाभवानी देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. सकाळी कर्नाटक हायकोर्टचे न्यायाधीश के. सोमशेखर, छत्रपती संयोगिताराजे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दिवसभर कारंजा चौक येथे भक्तीगीत, भावगीतांचे कार्यक्रम रंगले.

.नवरात्रोत्सवात भाविकांसाठी देवस्थान समिती, अंबाबाई भक्त मंडळ यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था व व्यक्तींच्यावतीने भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय कक्षही स्थापन करण्यात आला आहे. अंबाबाई भक्त मंडळाच्यावतीने रविवारी ५०० भाविकांनी मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला. मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस, स्वयंसेवक यांच्यासाठीही मोफत अन्नछत्र सेवा पुरवण्यात आली आहे. तसेच नवरात्रकाळासाठी दोन लाख लाडू प्रसाद विक्रीसाठी तयार ठेवण्यात आला असून कळंबा कारागृहातील महिला कैद्यांनी हा प्रसादाचा लाडू बनवला आहे.

रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या सुवर्ण पालखीत ठेवण्यात आलेल्या अंबाबाईच्या उत्सवमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. अलंकारीक पूजा, पालखी मिरवणूक याचे थेट प्रक्षेपण मंदिराच्या आवारात लावण्यात आलेल्या स्क्रीनवर भाविकांना पाहता येत आहे.

दरम्यान, शहरातील विविध सार्वजनिक तरूण मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुर्गामूर्तीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. सायंकाळी सहानंतर आकर्षक रोषणाईसह वाद्यांच्या निनादात दुर्गामूर्तींचे आगमन झाले. तर रात्री शहरातील अनेक भागामध्ये दांडियाचे फेर घुमू लागले.

Web Title ambabai kolhapur 70 thousand devotees take darshan first day

संबंधित बातम्या

Saam TV Live