इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करणं अशक्‍य नाही : शरद पवार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 जानेवारी 2020

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारकाचे 25 टक्के काम झाले आहे. 75 टक्के बाकी असले तरी येत्या दोन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करणं अशक्‍य नाही अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  दिली. 

इंदू मिलची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांनी आज इंदू मिलला भेट देऊन तेथे होणाऱ्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. 

 
 

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारकाचे 25 टक्के काम झाले आहे. 75 टक्के बाकी असले तरी येत्या दोन वर्षांत स्मारकाचे काम पूर्ण करणं अशक्‍य नाही अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ाआज येथे दिली. 

इंदू मिलची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांनी आज इंदू मिलला भेट देऊन तेथे होणाऱ्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, "" गर्दीच्या काळातही स्मारकाची काळजी घ्यावी लागेल. न्यूयॉर्कमधे गेल्यावर जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी लोक जातात अगदी तसेच इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पाहण्यासाठी लोक आले पाहिजेत. शाहपूरजी पालनजी हे काम करत आहेत हे स्मारक महत्वाचं आकर्षण झाल्याशिवाय राहणार नाही.'' 

चैत्य भूमी आणि हे स्मारक असा दुहेरी संगम आहे देशातील कोणताही व्यक्ती मुंबईत आल्यानंतर या ठिकाणच्या स्मारकाला भेट दिल्या शिवाय राहणार अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी शेवटी व्यक्त केली. 

WebTittle :: Ambedkar Memorial at Indu Mill impossible to complete in two years: Sharad Pawar


 

संबंधित बातम्या

Saam TV Live