तर मी राजकारण सोडून देईन- आव्हाड

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

मुंबई- प्रकाश आंबेडकरजी, आरएसएसला कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे याचा मसुदा आपण द्या, महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आज (ता.24) ट्विट करून म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत कसे आणता येईल याचा मसुदा समोर ठेवावा. त्या मसुद्यावर आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या घेण्याची जबाबदारी माझी असेल आणि तुम्ही दिलेल्या मसुद्यावर जर सह्या झाल्या नाहीत तर मी राजकारण सोडून देईन पण आघाडीत बिघाडी करू नका, असे स्पष्ट मत आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे शक्तिप्रदर्शन पाहून त्याचा लोकसभेच्या किती जागावर निवडून येण्यासाठी फायदा होईल याबाबत शंका आहे, पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नक्की तोटा होऊन वंचित बहुजन आघाडीचा फायदा हा भाजप युतीला होईल अशी शक्यता आहे. या कारणामुळेच जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत बिघाडी करू नका असे आवाहन केले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे.

Web Title: Ambedkarji then I will leave politics says jitendra Awhad

संबंधित बातम्या

Saam TV Live