अंबरनाथचं जीआरपी धरण म्हणजे मद्यपींचा अड्डा

GIP Dam.jpg
GIP Dam.jpg

उल्हासनगर : अंबरनाथमधील रेल्वेचं ग्रेट इंडियन पेनिन्सुला Great Indian Peninsula धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनलं असून या धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं पाहायला मिळतंय. या धरणाशेजारीच मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर असून मद्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा यांचा खच धरणाशेजारी साचला आहे. अशी माहिती काकोळे गावचे सरपंच नरेश गायकर यांनी दिली आहे.  (Ambernath's GIP dam has become a haven for alcoholics ) 

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी MIDC  भागातील काकोळे Kakole गावाशेजारी रेल्वेनं २०० वर्षांपूर्वी धरण बांधलं होतं. त्यावेळेच्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला Great Indian Peninsula या नावाने हे धरण ओळखलं जाऊ लागलं. याच धरणातून कोळशाच्या इंजिनांना लागणारं पाणी वाहून नेलं जात होतं. मात्र कोळशाची इंजिनं बंद झाल्यानंतर अनेक वर्ष हे धरण दुर्लक्षित होतं. अखेर लालूप्रसाद यादव Laluprasad Yadav  हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी या धरणाशेजारी रेल नीरचा कारखाना उभारला आणि हे धरण पुन्हा उपयोगात आलं. मात्र हे धरण शहरापासून जवळ असल्यामुळे या धरणावर दररोज अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या भागातून शेकडो लोक येत असतात. तर धरणाच्या परिसरात मद्यपींचाही मुक्तसंचार आहे. तसेच अनेक जण धरणात अंघोळ करण्यासाठी तसंच गाड्या धुण्यासाठी सुद्धा येत असतात. या धरणाच्या आजूबाजूला मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. निर्माल्य आणि अन्य कचरासुद्धा मोठ्या प्रमाणात धरणाच्या आजूबाजूला पडला असल्याचे सरपंच नरेश गायकर यांनी सांगितले.

दरम्यान, पावसाळ्यात हा सगळा कचरा धरणात वाहून येतो आणि अखेर हेच पाणी रेल्वेच्या प्रकल्पातून प्रवाशांपर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे या धरणाची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. मात्र असं असतानाही धरणावर रेल्वेकडून एकही सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. मद्यपी बिनधास्तपणे धरणाच्या परिसरात उच्छाद घालत असून धरणाच्या आजूबाजूला तर अक्षरश: एखाद्या दारूच्या गुत्त्यासारखी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे रेल्वेने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत काकोळे गावचे सरपंच नरेश गायकर यांनी सुद्धा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र तरीही अजून सुद्धा रेल्वेकडून या धरणाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने लक्ष दिलं जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच रेल्वेला जाग येणार का? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com