Good News! अखेर कोरोनावर रामबाण लस अमेरिकेला सापडली...

साम टीव्ही
मंगळवार, 19 मे 2020
  • कोरोनावरील लस ठरतेय गुणकारी 
  • ८ जणांवरील चाचणी ठरली यशस्वी 
  • दुसऱ्या टप्प्यात ६०० जणांना दिली जाणार लस

कोरोनामुळे धास्तावलेल्या संपूर्ण जगासाठी अतिशय दिलासादायक बातमी. कोरोनावरील पहिल्यावहिल्या लसीची चाचणी यशस्वी ठरलीय. आता पुढच्या टप्प्यात ६०० रुग्णांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे

कोरोनावर रामबाण ठरेल अशी लस अखेर उपलब्ध होण्याची शक्यता बळावलीय. मॉडर्ना या औषध कंपनीनं ही लस तयार केलीय. आता या लसीचे सकारात्मक परिणाम समोर आलेयत. 

माणसावर प्रयोग केलेली ही अमेरिकेतली पहिलीच लस आहे. मार्चच्या सुरवातीला ८ रुग्णांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला. या आठही जणांना लसीचे दोन डोस देण्यात आले. या लसीमुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढत असल्याचा दावा मॉडर्ना औषध कंपनीनं केलाय. वास्तविक, स्वेच्छेनं चाचणीला तयार झालेल्या ८ रुग्णांवरच हा प्रयोग करण्यात आलाय. या रुग्णांच्या शरीरातून ज्या अँटीबॉडीज मिळाल्या, त्याचा वापर करून प्रयोगशाळेत माणसांच्या पेशींवर परीक्षण करण्यात आलं. या अँटीबॉडीज कोरोना व्हायरसचा फैलाव रोखू शकत असल्याचं या चाचणीतून निष्पन्न झालं. 

आता दुसऱ्या टप्प्यात ६०० रुग्णांवर या लसीचा प्रयोग केला जाणारंय. तर जुलैमध्ये या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पार पडेल. या तिसऱ्या टप्प्यात हजारो रुग्णांना ही लस दिली जाणारंय. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातले परिणाम सकारात्मक आल्यास या वर्षाच्या अखेरीस ही लस मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगभरात उपलब्ध होईल, असं या औषध कंपनीनं म्हटलंय. ही लस गुणकारी ठरल्यास कोरोनाला हद्दपार करणं सहजशक्य होणारंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live