VIDEO | अमेरिकेत परिस्थिती गंभीर, त्यात लॉकडाऊनमुळे लोक करतायत निदर्शनं

साम टीव्ही
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

अमेरिकेत कोरनामुळे सगळ्यात जास्त लोकांचा मृत्यू झालाय. अशातच लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये रोष पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं लोक निदर्शनं करतायेत. 

अमेरिकेत कोरनामुळे सगळ्यात जास्त लोकांचा मृत्यू झालाय. अशातच लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये रोष पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं लोक निदर्शनं करतायेत. 

ही गर्दी...ही घोषणाबाजी हे चित्र आहे अमेरिकेतलं...त्याच अमेरिकेतलं जिथं सध्या कोरोनानं अक्षरश: थैमान घातलंय. अमेरिकेत कोरोनामुळे सगळ्यात जास्त मृत्यू झाले आहेत. तिथंही लॉकडाऊन सुरुच आहे. अशात अमेरिकेतील लोकांमध्ये मोठा रोष पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरुन निदर्शनं करत असल्याचंही दिसून आलंय. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हीच स्थिती आहे. लास वेगास, डेनवर सारख्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी दिसून आलीय. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचेही तीनतेरा वाजलेत. त्यात मास्क न घालताच लोकं रस्त्यावर उतरुन निदर्शनं करत असल्याचं पाहायला मिळालंय. लॉकडाऊन उठवण्याची मागणी अमेरिकेतील नागरिकांकडून केली जातीय. त्यासाठीच अनेक ठिकाणी तीव्र निदर्शनं केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत कोरोनामुळे अमेरिकेत 47 हजार जणांहून अधिक जणांना जीव गेलाय. 8 लाखापेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण तरीही लोकांना त्याची पर्वा नाही...तिथल्या जनतेत रोष आहे. मात्र रस्त्यात उतरून असा रोष व्यक्त करणं खरंच अमेरिकेला परवडण्यासारखं आहे का? हा विचारही इथल्या लोकांनी करायल हवा...
 


संबंधित बातम्या

Saam TV Live