महाराष्ट्रातून 45 जागा जिंकून द्या: अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

पुणे : महाराष्ट्रातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उखडून टाका. महाराष्ट्रात भाजपला 45 जागा जिंकून द्या, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.

शक्ती केंद्र संमेलन आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज (शनिवार) पुणे दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुणे, बारामती आणि शिरूर या मतदारसंघांबाबत आढावा घेतला. यासह मोदी सरकारने केलेल्या योजनांविषयी माहिती देत विरोधकांवर जोरदार टीका केली.

अमित शहा म्हणाले, ''भाजप नेत्यांचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आगामी निवडणूक निवडणूक जिंकणे देश आणि जनतेसाठी महत्वाची आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. निवडणूक जिंकण्याच मोठा आधार हा कार्यकर्ताच असतो. आम्ही परिवारवाद संपुष्टात आणला. जातीवादाचे राजकारण करणाऱ्या पक्ष संपुष्टात येत आहेत. 2019 ची निवडणूक आम्ही जिंकलो तर जातीवाद आणि परिवारवाद 200 फूट खड्ड्यात गाडला जाईल. महाआघाडी जिंकली तर पुन्हा देशात परिवारवाद आणि जातीवादाकडे गेला. देशाच्या 70 वर्षांपैकी 55 वर्षे गांधी कुटुंब सत्तेत होते. पण, देशात कोणतेही परिवर्तन झाले नाही. मात्र, मोदींच्या 55 महिन्यांच्या कार्यकाळात देशाचा विकास झाला. यंदा सादर झालेला अर्थसंकल्प प्रत्येक घटकासाठी विकास करणारे असेल. देशाचा गौरव आणि विकास करेल तेच देशाचे सक्षम नेतृत्व करेल हे मोदींना दाखवून दिले. शरद पवार यांनी गेल्या पाच वर्षांत आणि आमच्या सरकारच्या कार्यकाळातील पाच वर्षांच्या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाची आकडेवारी जाहीर करावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी आमच्या सरकारच्या काळात जास्त झाली. तुम्ही दहा वर्षांत 53 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. आता मोदी सरकार दरवर्षी 75 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खातात जमा होणार आहेत. राहुल गांधी यांना बटाटा कुठे उगवतो हे माहीत नाही आणि म्हणे बटाटयाची कारखाना सुरू करणार आहेत. जीएसटीमुळे अनेक व्यापाऱ्यांना फायदा झाला असून, 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न कर्जमुक्त केल्याने अनेकांना याचा फायदा झाला आहे. मोदी सरकारच्या काळात आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. मोदींच्या नेतृत्वात सबका साथ, सबका विकास झाला. काँग्रेससाठी ओआरओपी हे फक्त ओन्ली राहुल आणि ओन्ली प्रियांका हे आहे. आम्ही माजी जवानांसाठी निधी दिला. देशाच्या कानाकोपऱ्यातून घुसखोरांना बाहेर काढण्यात येईल.''

पाच वर्षांत 5 कोटी गरिबांच्या घरात मोफस गॅस कनेक्शन देण्यात आले. अडीच कोटी नागरिकांना घरे देण्यात आली. सौभाग्य योजनेतून त्यांच्या घरात वीज देण्यात आली. 8 कोटी रोजगार देण्यात आले आहेत, असे अमित शहा यांनी सांगितले.

Web Title: Amit Shah calls for 45 seats in Maharashtra in Lok Sabha 2019

संबंधित बातम्या

Saam TV Live