युतीच्या चर्चेसाठी भाजप मातोश्रीच्या दारी?

युतीच्या चर्चेसाठी भाजप मातोश्रीच्या दारी?

मुंबई- युतीच्या चर्चेसाठी भाजपचे जेष्ठ नेते मातोश्रीवर येणार आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह हे मातोश्रीवर युतीच्या बोलण्यासाठी येणार असल्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय वातावरण ढवळून निघायला सुरवात झाली आहे. आता युतीच्या चर्चेसाठी भाजपची जोरदार लॉबिंग सुरु असून पुढील चर्चेसाठी भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. 

चर्चा सफल ठरली तर युती नाहीत शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचेही बोलले जात आहे. सध्या शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेसाठी 24-24 आणि विधानसभेसाठी 144-144 असा फॉर्म्युला शिवसेनेने पुढे केला असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Amit Shah, Nitin Gadkari, Rajnath Singh likely to visit Matoshree for alliance talks with Shivsena

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com