शाहरुखला आणखी एक धक्का....'या' अभिनेत्रीने दिला चित्रीकरणास नकार

साम टिव्ही

आर्यन खानला कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर शाहरुख खानचे दिवस फिरल्यासारखे दिसत आहेत. शाहरुख खानने तामीळ दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ अॅटली याच्या बरोबर एक फिल्म साईन केली आहे. मात्र, त्याच्या बरोबर काम करण्यास आणखी एका अभिनेत्रीने नकार दिला आहे.

Instagram

शाहरुख खानने तामीळ दिग्दर्शक अरुण कुमार उर्फ अॅटली याच्या बरोबर एक फिल्म साईन केली आहे. मात्र, त्याच्या बरोबर काम करण्यास आणखी एका अभिनेत्रीने नकार दिला आहे.

Instagram

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा ही अॅटली दिग्दर्शित 'लायन' चित्रपटात भूमीका करणार होती. या चित्रपटाचे अर्धे अधिक शूटींग पूर्ण झाले आहे. मात्र, आता अचानक नयनताराने आपण चित्रपटात काम करु शकत नाही असे अॅटलीला कळवले आहे. यासाठी तिनं तारखांचं कारण पुढे केलं आहे.

Instagram

त्यामुळे आत या चित्रपटात समंथा रुथ प्रभू हिच्या नावाचा विचार सुरु झाला आहे

Instagram

'दंगल' चित्रपटात बबिता कुमारीची भूमीका करणारी सान्या मल्होत्रा देखील या चित्रपटात भूमीका करते आहे

Instagram

मात्र, स्वतः शाहरुखच मुलगा आर्यनला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आटापिटा करतो आहे. त्यामुळे त्याचेही शुटिंगकडे दुर्लक्ष होते आहे. अशावेळी शाहरूखचा बाॅडी डबल वापरुन काही सिक्वेन्स पूर्ण करण्याचा विचार अॅटली करतो आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram