July Upcoming Movies: हे ६ चित्रपट जुलै गाजवणार, बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'ओम - द बॅटल विदिन' थिएटरमध्ये 'रॉकेटरी द: नंबी इफेक्ट'ला स्पर्धा देत आहे. अॅक्शन थ्रिलर चित्रपटात आदित्य रॉय कपूर, आशुतोष राणा, जॅकी श्रॉफ आणि संजना सांघी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी केले आहे. | (official poster of om the battle within)
आर माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' हा चित्रपट आज म्हणजेच जुलै महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा बायोपिक इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. | (official poster of Rocketry: The Nambi Effect)
विद्युत जामवालचा 'खुदा हाफिज पार्ट २' हा चित्रपट ८ जुलै रोजी रिलीज होणार आहे. | (official poster of Khuda Haafiz)
'शाबाश मिठू'च्या माध्यमातून तापसी पन्नू मिताली राजच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाची कथा पडद्यावर आणणार आहे. हा चित्रपट १५ जुलैला रिलीज होणार आहे. | (official poster of Shabaash Mithu)
रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपटही याच महिन्यात रिलीज होत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २२ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्साही आहेत. | (official poster)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२९ जुलै रोजी 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि दिशा पटानी देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर ३० जून रोजी रिलीज झाला आहे. | (official poster of Ek Villain 2)