Nagpur : वाघिणीचे दात लागून बछड्याचा मृत्यू; गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील दुर्देवी घटना

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नवजात पिलाला जन्म दिल्यावर त्याला वाघिणीकडून उचलताना दात लागून बछड्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात घडली आहे.

Sanjay Daf

ली नावाच्या वाघिणीला दिवस गेल्याचे लक्षात आल्यावर तिची प्राणी संग्रहालयात विशेष स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

Sanjay Daf

'ली', नावाच्या वाघिणीच्या बछड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्राणी संग्रहालयातील 'ली' आणि 'राजकुमार' या जोडीला पिल्ले होण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरु होते.

Sanjay Daf

२०१६ मध्ये साहेबराव नावाच्या वाघापासून झालेल्या चार पिल्लांना तिने मारले होते. त्यामुळं यावेळी तिने पिल्लांना न स्वीकारल्यास संगोपनासाठी विशेष इनक्यूबेटरची व्यवस्था प्राणिसंग्रहालयात करण्यात आली होती.

Sanjay Daf

मात्र दात लागून पिल्लाचा मृत्यू झाल्यानं प्राणी संग्रहालयात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sanjay Daf