Ankush Dhavre
तुम्ही मोदक खात नसाल तर खायला सुरूवात करा कारण मोदकामुळे आपले आरोग्य चांगले राहते.
मोदकामध्ये गुळ, खोबरं,तुप आणि खसखस असे अनेक पदार्थ असतात.
हे पदार्थ आपल्या शरीराला फायदेशीर आहेत.
यामध्ये असलेल्या गुळामुळे अपचनाचा त्रास कमी होतो.
हिमोग्लोबिन वाढते, आणि अशक्तपणाही दुर होतो. खोबऱ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मोदकातील पुरणामध्ये तूप असते. यामुळे आतड्यांमधील घातक, टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
गूळ पोटात गेल्यावर अॅसिटिक अॅसिड तयार होते आणि ते पचनक्रिया वाढवून अपचन टाळण्यास मदत करते.
गूळ हे गॅसनाशक आहे. आणि यामुळे आपली भुक वाढते. यामुळे आरोग्याच्या फायद्यासाठी मोदक खाल्लेच पाहिजेत.