मासिक पाळीसोबतच इतर अनेक आजारांवर फायदेशीर ठरतील, सूर्यफुलाच्या बिया !

कोमल दामुद्रे

प्रत्येक फुलाला त्याचा खास रंग, वास, आकार असतो. त्याचप्रमाणे त्या फुलाचं वैशिष्ट्य आणि महत्त्वदेखील वेगवेगळं असतं.

Sunflower | Canva

पिवळ्या रंगाचं मोठं टपोरं फुललेलं सूर्यफूल अनेकांचं लक्ष वेधून घेत असतं. खरं तर सूर्यफूलाचे असंख्य फायदे आहेत.

Sunflower Benefits | Canva

साधारणपणे सूर्यफूलांच्या बियांपासून तेल काढण्यात येते हा एकच उपयोग आपल्याला माहित आहे.

Sunflower Oil | Canva

या बियाचे अनेक फायदे आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई, कॅल्शिअम, खनिजे असतात.

Sunflower Seeds | Canva

भाजलेल्या किंवा खारवलेल्या सूर्यफूलाच्या बिया या शरीरासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी या बिया खाणं फायदेशीर ठरेल.

Sunflower Seeds Benefits | Canva

सूर्यफुलांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे केसांसाठी ते फायदेशीर ठरतं.

Benefits For Hair | Canva

सूर्यफुलाच्या बिया खाल्लाने मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी यासारखे त्रास कमी होतात.

benefits for periods | Canva