Priya More
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा आज वाढदिवस आहे.
महिमा चौधरी आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.
महिमा चौधरीने शाहरुख खानसोबत 'परदेस' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.
महिमाने 'परदेस'नंतर 'दिल क्या करे', 'दाग: द फायर', 'लज्जा', 'धडकन', 'बागबान', 'सँडविच', 'कुरुक्षेत्र', 'लज्जा', 'ऐ दिल है तुम्हारा' 'सेहर' सारख्या चित्रपटात काम केले.
कार अपघातामुळे महिमा चौधरीचे करिअरच बदलले. या अपघातामध्ये तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती.
अजय देवगणच्या 'दिल क्या करे' चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना महिमाचा अपघात झाला होता.
या अपघातानंतर चेहऱ्यावरील शस्त्रक्रिया करुन सुमारे ६७ तुकडे काढण्यात आले होते. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली.
मागच्या वर्षी महिला चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर झाला. पण तिने या आजारावर मात केली.
मुलीचे पालनपोषण करत महिमा चौधरीने कॅन्सरवर उपचार घेतले. महिमा आता एकदम बरी आहे.
लवकरच महिमा चौधरी कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे.