साम टिव्ही ब्युरो
झुंड सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सायली पाटीलचा दुसरा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
नागराज मंजुळेच्या घर, बंदूक, बिरयानी या आगामी सिनेमात ती झळकणार आहे.
एकाच चित्रपटानंतर सायलीने तरुणाईच्या हृदयात घर केलंय.
सायलीने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
फोटोत सायलीने हातात गुलाबाचं फुल घेतलेलं दिसत आहे.
सायलीने पोस्टचा कॅप्शन दिलं की, फुल… प्रेम व्यक्त करायचा एक गोड मार्ग. हो ना ?
सायलीच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत.
सायली आणि आकाश ठोसरची सिनेमातील केमिस्ट्री पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.