Priya More
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
परिणीती आणि राघवच्या लग्नाला अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे.
परिणीती आणि राघवच्या लग्नाची पत्रिका समोर आली असून यावर लग्नाचे सर्व विधीच्या वेळा देण्यात आल्या आहेत.
२३ सप्टेंबरपासून दोघांच्या लग्नाच्या विधीला सुरुवात होणार असून २४ ला राघव आणि परिणीती लग्नबंधनात अडकणार आहेत.
राघव आणि परिणीती यांच्या लग्नाचे सर्व विधी उदयपूरमधील हॉटेल लीला आणि ताज लेक पॅलेसमध्ये होणार आहेत.
या दोन्ही हॉटेलमध्ये परिणीती आणि राघवच्या पाहुण्याच्या राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
राघव- परिणीती यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि देशातील अनेक राजकीय मंडळी देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
२३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताच्या कार्यक्रमाला सुरू होणार आहे.
२४ सप्टेंबरला वरात त्यानंतर दुपारी ४ वाजता दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
२४ सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजता परिणीती आणि राघवच्या लग्नानिमित्त रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.