ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फराह खान आणि शिरीष कुंदर - बॉलीवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आणि तिचा पती शिरीष कुंदर हे देखील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत ज्यांनी मुलाला जन्म देण्यासाठी सरोगसीचा अवलंब केला. तिने IVF चा मार्ग निवडल्यानंतर, 11 फेब्रुवारी 2018 रोजी तिने 3 मुलांना जन्म दिला.
सोहेल खान आणि सीमा - पहिल्या मुलाच्या जन्मानंतर 10 वर्षांनी सीमा आणि सोहेल खान यांनी दुसरे मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी पालक होण्यासाठी सरोगसीचा देखील र्याय निवडला, लग्नाच्या 13 वर्षानंतर, 2011 मध्ये ते दुसरे अपत्य योहानचे पालक बनले.
शाहरुख खान आणि गौरी खान - यांनी देखील सरोगसीच्या मदतीने त्यांच्या तिसर्या अपत्याचे पालक बनले, 2013 मध्ये शाहरुख खान आणि गौरी खान यांचा धाकटा मुलगा अबरामचा जन्म सरोगसीद्वारे झाला.सरोगसीच्या माध्यमातून तुषार आपल्या मुलाचा एकल पालक झाला.
तुषार कपूर - सरोगसीच्या माध्यमातून तुषार आपल्या मुलाचा एकल पालक झाला. तुषार कपूरचेही अद्याप लग्न झालेले नाही पण तरीही तो एका मुलाचा पिता आहे, तुषारला लक्ष्य नावाचा मुलगा आहे.
एकता कपूर - निर्माती एकता कपूरने अजून लग्न केलेले नाही, पण ती एका मुलाची आई आहे. तिचा भाऊ तुषार कपूर प्रमाणेच एकता कपूर देखील सरोगसीच्या मदतीने सिंगल पॅरेंट बनली आहे. एकताच्या मुलाचे रवी असे नाव आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास - यांनी अलीकडेच पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली. त्यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.लग्नाच्या ३ वर्षानंतर या जोडप्याने सरोगेटद्वारे आपल्या बाळाचे स्वागत केले. प्रियंकाने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची माहिती शेअर केली.
सनी लिओन – डॅनियल वेबर - सरोगसीचा पर्याय निवडल्यानंतर अभिनेत्री सनी लिओन आणि तिचा पती डॅनियल वेबर यांना जुळी मुले झाली आहेत. 2018 मध्ये त्यांच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा - या जोडप्याने 2020 मध्ये सरोगसीद्वारे तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यांना सरोगसीद्वारेएक मुलगी झाली जिचे नाव समिशा आहे. याआधी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा मुलगा विआनचे आई-वडील झाले आहेत.
करण जोहर - दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने सरोगसीद्वारे यश आणि रुही या जुळ्या मुलांचा पिता झाला आहे. करण जोहरच्या जुळ्या मुलांचा जन्म फेब्रुवारी 2017 मध्ये झाला होता.
श्रेयस तळपदे आणि दीप्ती - यांनी मे 2018 मध्ये सरोगसीद्वारे पालकत्व स्वीकारले.
या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव आद्या ठेवले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.