Manasvi Choudhary
दैनदिन जीवनात आहाराविषयीच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.
स्वयंपाक करताना आपण अनेक गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असतो.
स्वयंपाक करताना व स्वयंपाक झाल्यावर काही नियमांचे पालन केल्यास अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी ची कृपा राहील.
स्वयंपाक करताना पहिली व शेवटची पोळी किंवा भाकरीचं काय आहे महत्व ते जाणून घेऊया
पहिली भाकरी गायीला तर शेवटची भाकरी कुत्र्यासाठी बनवली जाते आणि आनंदाने त्यांना खायला दिली जाते
हिंदू धर्मात मुका जनावऱ्यांना अन्न आणि पाणी देणे यापेक्षा महान पुण्य कोणतेही नाही
हिंदू धर्मात गाय माता असून अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजाही केली जाते. मान्यतेनुसार, गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे. ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी -देवतांनाही आहार देत आहात.
कुटुंबात सुख-शांती नसेल तर सकाळी सर्वप्रथम केलेली भाकरी गायीला आणि शेवटची भाकरी कुत्र्याला खाऊ घालावी. यामुळे मतभेद आणि भांडणाची समस्या येत नाही