Manasvi Choudhary
मराठी तसेच हिंदी सिनेमातून आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री प्रिया बापटचा आज वाढदिवस आहे.
प्रिया आणि उमेश हे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात.
नाटक, मालिका आणि चित्रपट या क्षेत्रातून प्रिया बापट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे
प्रिया बारावीत १८ वर्षांची असताना उमेश कामतच्या प्रेमात वेडी झाली होती.
शाळेत असल्यापासून प्रियाला उमेश आवडत असल्याने अखेर तिने स्वत:च त्याला प्रपोज केला.
त्यानंतर दोघेही ५ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिले. २०११ मध्ये उमेश आणि प्रिया लग्नबंधात अडकले.
यावर्षी या दोघांच्या वैवाहिक जीवनाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सोशल मीडियावर हे दोघेंही कपल एकमेकांसोबतचे आनंदी क्षण शेअर करतात. ज्याला चाहत्यांची पसंती मिळते.