Farm Law Repeal: कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पहा नेत्यांच्या प्रतिक्रिया-

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेली अनेक महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून लागू करण्यात आलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

3 कायदे लागू झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर व पंजाब, हरयाणा मध्ये आंदोलन सुरु झाले. ते आतपर्यंत सुरु होते. या आंदोलनात हिंसाचार झाला. अनेक शेतकऱ्यांचे मृत्यूही झाले. अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनापुढे केंद्र सरकार नमले व आजपासून हे कायदे मागे घेण्याची घोषणा मोदी यांनी केली,

निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केले – शरद पवार

शरद पवार म्हणले की, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केलेहे सरकारला उशिरा सुचलेला शहाणपण आहे. संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो असे देखील पवार यावेळी म्हणले आहे.

Saam Tv

देशाच्या अन्नदाताच्या सत्याग्रहामुळे कायदे मागे घ्यायला लावले - राहूल गांधी

राहुल गांधींनी त्यांचा जुना व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले आहे की, देशाच्या अन्नदाताच्या सत्याग्रहामुळे त्यांना शेतीविषयक कायदे मागे घ्यायला लावले आहेत. शेतकऱ्यांच्या विजयाचे त्यांनी अभिनंदन केले आहे. 2020 मध्ये केंद्राने तीन शेती कायद्ये मंजूर केल्यापासून देशभरातील शेतकरी या विरोधात आंदोलनं करत आहेत.

"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं"; नवाब मलिक

दिल्लीतील या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावली होती. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी वर्षभरापासून आपले आंदोलन सुरूच ठेवले होते. या आंदोलनामध्ये लोकांनी प्राणाची आहुती देखील दिली आहे. शेतकरी काय मागे हटले नाहीत. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला आहे.

Saam Tv

देर आये दुरुस्त आये: अमोल कोल्हे

देशभरातून कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत, देर आये दुरुस्त आये असे म्हटले आहे. अमोल कोल्हे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे

...म्हणून 'एकांतवासात' गेले होते खासदार डॉ. अमोल कोल्हे | Saam Tv

"...म्हणून 3 काळे कायदे सरकारने वापस घेतले"- संजय राऊत

आज खऱ्या रूपाने देशाची मन की बात समोर आली आहे. 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे पण शेवटी सरकारला माघार घ्यावीच लागली. हे सर्व 1 वर्ष आधी ऐकलं असत तर ही वेळ आली नसती, 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते.

संजय राऊत | - Saam Tv

"देशातील शेतकऱ्यांचा विजय", गृहमंत्री वळसे पाटील यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

'आधी संसदेत कायदे मागे घ्या आणि मगच...; राकेश टिकैत

केंद्र सरकारने Central Government शुक्रवारी कृषीविषयक कायदे Farm Laws मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, तरीही आंदोलन काही संपवणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि संयुक्त किसान मोर्चाचे सहसंयोजक राकेश टिकैत Rakesh Tikait यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन लगेच परतणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Saam Tv

शेतकरी चळवळीच्या इतिहासातील "सर्वात काळा दिवस"- सदाभाऊ खोत

तुम्ही जर तुमचं भल करणाऱ्याच्या मागं भक्कम उभं राहिला नाहीत तर तुमच्या जीवावर उठणारे जिंकतात. शेतकरी (Farmer) चळवळीच्या इतिहासातील "सर्वात काळा दिवस" म्हणुन आजच्या दिवसाची नोंद होईल. तीन कृषी कायदे (3 Farm Law) मागे घेण्याची दुर्दैवी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

ऐतिहासिक विजय : राजू शेट्टी

स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले बहुमताच्या बळावर आम्ही काही करु शकताे हे या लाेकशाहीत चालत नाही हे या निर्णयाने सिद्ध झाले आहे. त्यांच्याकडे लाेकसभा, राज्यसभेत बहुमत हाेते. शेतकरी चिकाटीने लढत राहिले. आंदाेलनात फुट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. आज शेतक-यांचा विजय हा एेतिहासिक विजय झाला आहे.

'देर आये दुरुस्त आये' - छगन भुजबळ

नाशिक: गुरुनानक जयंतीच्या पवित्र दिवशी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले. हे स्वागतार्ह असून देशात विविध ठिकाणी पोट निवडणुकीत भाजपला आलेलं अपयश आणि उत्तर प्रदेशसह आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी खोचक प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

"पुतळ्याच्या जागेवरून वाद नाही", जागा निवडीबाबत एकत्र निर्णय घेऊ- छगन भुजबळ | Saam Tv

शेतकऱ्यांनी एकजुटीने दिलेल्या लढ्याला यश - धनंजय मुंडे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. धनंजय मुंडे आपल्या ट्विट करून अभिनंदन केलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हणलं की, शेतकऱ्यांनी एकजुटीने दिलेल्या लढ्याला यश आले आहे. केंद्र सरकारने तिन्ही जाचक कृषी कायदे रद्द केले, हा शेतकऱ्यांच्या धैर्याने दिलेल्या लढ्याचा विजयच ! या लढ्यात बलिदान दिलेल्या शेतकरी बांधवांना नमन आहे. किसान एकता जिंदाबाद ! जय किसान... !

Saam Tv

कृषी कायदे मागे घेताचं कंगना संतापली !

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) सोशल मीडियावरुन एक पोस्ट देखील शेयर करत आपल्याला कृषी कायदा रद्द केल्याने वाईट वाटल्याचे सांगितले आहे. या निर्णयाला दु:खद, लज्जास्पद आणि अयोग्य असल्याचे म्हंटले आहे. मोदींनी आज सकाळी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कंगनाने एक पोस्ट शेअर केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.