भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 'या' पाच खेळाडूंना टी-२० सीरिजमध्ये मिळणार संधी ?

नरेश शेंडे

इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम सुरु असून क्रिकेटच्या मैदानात अनेक रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. आयपीएलचा यंदाचा मोसम संपल्यानंतर दहा दिवसांनंतर भारताचा टी-२० सीरिजचा दक्षिण आफ्रिक दौरा आयोजित करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही नवख्या खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड होण्याची शक्यता आहे.

Indian cricket team | Saam tv

१) मोहसीन खान : आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर मोहसीन खानने अप्रतिम कामगिरी केलीय. लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी खेळणाऱ्या मोहसीन खानने आतापर्यंत पाच सामने खेळले असून ९ विकेट्स घेण्याची कामगिरी केलीय. दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्ध झालेल्या एका सामन्यात मोहसीनने १६ धावा देऊन चार विकेट्स घेतल्याची दमदार कामगिरी केलीय.

Mohsin Khan | Instagram

२) आवेश खान : लखनऊ सुपर जायंट्स संघाचाच आणखी एक वेगवान गोलंदाज आवेश खानने भेदक गोलंदाजी करत यंदाच्या आयपीएलमध्ये धमक दाखवून दिलीय. आवेशने ९ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. आवेशने यावर्षी वेस्टइंडिजच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Avesh Khan | Instagram

३) उमरान मलिक : जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. उमराने १५० हून अधिक KPH वेगात गोलंदाजी करुन दिग्गज खेळाडूंच्या यष्ट्या उडवल्या आहेत. सनरायजर्स हैद्राबादसाठी खेळणाऱ्या उमरानने ११ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आगामी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उमरान मलिकची भारतीय संघात निवड केली जावू शकते.

umran malik | instagram

४) शिखर धवन : आयपीएल २०२२ मध्ये शिखर धवन कमालीचा फॉर्ममध्ये आहे. धवनने पंजाब किंग्ससाठी ११ सामन्यांमध्ये ४२.३३ च्या सरासरीनं ३८१ धावा कुटल्या आहेत.धवनने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध गतवर्षी खेळला होता. परंतु, यंदाच्या आयपीएल हंगामात शिखरचा जबरदस्त फॉर्म लक्षात घेता त्याचं भारतीय संघात पुनरागमन होऊ शकतं.

Shikhar Dhawan | Instagram

5) हार्दिक पांड्या : गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने यंदाच्या आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. पांड्याने १० सामन्यांमध्ये ४१.६२ च्या सरासरीनं ३३३ धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याचंही पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hardik Pandya | Instagram