Friendship Day 2022: तुमच्या मित्रांसोबत हे ७ चित्रपट पहा, तुमची मैत्री आणखी घट्ट होईल

साम वृत्तसंथा

ये जवानी है दिवानी: अयान मुखर्जीचा चित्रपट ये जवानी है दिवानी या चार शाळकरी मित्रांची कथा आहे, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. कॉलेजच्या दिवसांपासून ते नोकरी आणि लग्नापर्यंतचे आयुष्य या चित्रपटात दाखवण्यात आले असून गाणीही चांगली आहेत.

Yeh Jawaani hai deewani Movies | Saam Tv

छिछोरे: सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्या या चित्रपटाची निर्मिती नितेश तिवारी यांनी केली असून त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. मित्रांसोबत हॅपी एंडिंगसह हा चित्रपट पहा आणि याद्वारे तुमच्या कॉलेज जीवनातील दिवस आणि आठवणी पुन्हा एकदा ताज्या करा.

Chhichhore | Saam Tv

दिल चाहता है: या चित्रपटात आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या असून हा चित्रपट फरहान अख्तरचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता.

Dil Chahata Hai | Saam Tv

वीरे दी वेडिंग: जर तुम्ही मुलगी असाल आणि तुमच्या मैत्रिणींसोबत चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर करीना कपूर, सोनम कपूर आहुजा, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया स्टारर हा चित्रपट तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. हा एक चांगला हलकाफुलका विनोदी चित्रपट आहे.

Veere Di Wedding | Saam Tv

जिंदगी ना मिलेगी दोबारा: झोया अख्तरचा चित्रपट जिंदगी ना मिलेगी दोबारा हा देखील अनेकांचा आवडता चित्रपट आहे. हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर, जे स्पेनमध्ये रोड ट्रिपला जात आहेत, ते खूप रिलेटेबल आहेत आणि प्रेक्षकांना अजूनही त्यांच्यातील संभाषणे आणि अनुभव आवडतात.

Zindagi Na Milegi Dobara | Saam Tv

Student Of The Year: या चित्रपटात आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुन धवन यांनी मुख्य भूमिका केली आहे. यात कॉलेज जीवनातील मित्रांचे दाखवले आहे.

Student Of The Year | Saam Tv

Shole: 'शोले' १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट. यात अमिताभ बच्चन, धर्मेन्द्र यांनी काम केले आहे. यात अमिताभ बच्चन आणि धर्मेन्द्र यांची मंत्रि अप्रतिम दाखवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shole | Saam Tv