Gajar Halwa : असा बनवा चवदार गाजराचा हलवा !

कोमल दामुद्रे

हिवाळा हा गाजरासाठी अधिक प्रमाणात ओळखला जातो. या काळात बाजारात गाजर सर्वत्र दिसतात.

Carrot | Canva

जीवनसत्त्व व फायबरयुक्त असणारे गाजर हे सलाद व भाजीच्या रुपात खाल्ले जाते.

Carrot Benefits | Canva

बाजारात गाजर आल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या पुलावपासून ते गाजर हलव्यापर्यंतच्या अनेक रेसिपींची चव चाखली जाते. जाणून घेऊया कसा बनवायचा गाजराचा हल्ला

Carrot Soup | Canva

5 ते 6 गाजर, 100 ग्रॅम मावा, 350 ग्रॅम दूध, अर्धी वाटी साखर, सुका मेवा चिरलेला, वेलची पावडर आणि 1/4 कप तूप.

Khoya | Canva

सर्व प्रथम, गाजर स्वच्छ आणि किसून घ्या. मग कढईत तूप घाला आणि थोडा वेळ गरम करा.

Carrot Scratch | Canva

तूप गरम झाल्यावर त्यात गाजर घालून 2-3 मिनिटे परतून घ्या. त्यानंतर दूध घालून 25-30 मिनिटे शिजवा. गाजर चांगले शिजल्यावर त्यात मावा, साखर मिसळा.

Add sugar | Canva

साखर चांगली वितळू द्या. साखर वितळल्यानंतर हलवा चिकट झाला आहे असे समजेल.

Carrot fry | Canva

यानंतर त्यात चिरलेले बदाम, काजू आणि उर्वरित ड्रायफ्रुट्स टाका. तसेच वेलची पूड पण घाला.

Gajar Halwa | Canva

ड्रायफ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा.

Gajar Halwa | Canva