Manasvi Choudhary
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरांत आरास, मखर सजावटीसाठी गणेशभक्ताची जोरदार तयारी सुरू आहे.
सजावटीसाठी पर्यावरणपूरक मखर सजावट करण्याकडे भक्ताचा कल वाढताना दिसत आहे.
काही वर्षापूर्वी थर्माकोल वापराला सरकारने बंदी घातली होती, यामुळेच पर्यावरणपूरक मखर निवडले जात आहेत.
मुंबईतील लालबाग परिसरात वास्तव्यास असणारे नाना शेंडकर हे गेली ४० वर्षे मखर बनवण्याचं काम करत आहेत.
ते सांगतात की, थर्माकोलच्या पासून होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण आहे. थर्माकोलचे बारीक बारीक कण हवेत मिसळतात.
यामुळेच त्यांनी २००० साली त्यांचा थर्माकोलचा कारखाना बंद केला आणि पर्यावरणपूरक मखर बनवण्याचं काम सुरू केलं.
पर्यावरण पूरक कागदी मखर बनवणाऱ्या शेंडकर यांनी यंदा मखरातून गड किल्ले संर्वधानाचा संदेश दिला आहे.
त्यांच्या या मखरांना मुंबईपासून ते परदेशातून पंसती मिळत आहे.
गडकिल्ले संवर्धानाचा संदेश देण्यासाठी त्यांनी गडकिल्ल्यांची प्रतिकृती असलेले एक फुटापासून ते मंडळांसाठी 25 फुटांपर्यंत हे गड किल्ले बनवले आहेत.
मुंबईसह परदेशात अमेरिका, जर्मनी, दुबई, अबुधाबी, श्रीलंका या गड किल्यांच्या मखरांना मोठी पसंती मिळत आहे.