Manasvi Choudhary
पाणी उकळताना त्यामध्ये ओवा आणि बडीशेप टाकून पाणी उकळावे. त्यानंतर त्याचे सेवन करावे.
आजरपणात तोंडाला चव नसते त्यामुळे तांदळाची पेज, डाळीचे पाणी, सूप यासारख्या पदार्थाचे सेवन करावे. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते.
आहारामध्ये मिश्र डाळीची धिरडी, अंड्यातले पांढरे पनीर या पदार्थाचा समावेश करा.
आजारी असल्यास चमचीत, मसालेदार आणि तिखट पदार्थ खाणं शक्यतो टाळा.
आजारपणामध्ये जास्तीत जास्त फळे खा. फळे ही धुवून सालासकट किंवा साल काढून खा.
आजारपणात बेकरीचे पदार्थ, बिस्कीट, ब्रेड, पाव यासारखे मैदायुक्त पदार्थ खाऊ नका.
आजरपणामध्ये गरम आणि ताजे अन्न खा. बाजारातील पॅकबंद केलेले आणि प्रिझर्व्हेटिव्ह पदार्थ खाऊ नका.