Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी खा कढीपत्ता, फायदे ऐकून व्हाल चकीत

Priya More

जेवण चविष्ट होते

जेवणाची चव वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्त्याची फोडणी दिल्याने जेवण चविष्ट होते.

curry leaves benefits | Social Media

समस्यांवर मात

कढीपत्ता आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. कढीपत्ता खाल्ल्यामुळे अनेक शारीरिक समस्यांवर मात करण्यास मदत होते.

curry leaves for health | Social Media

केस गळतीसाठी

केस गळती थांबवण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे. तुम्ही जे तेल लावता त्यामध्ये कढीपत्ता टाकून तळून घ्या आणि हे तेल केसाला लावा

curry leaves for hair | Social Media

कोंडा घालवण्यासाठी

केसातील कोंडा घालवण्यासाठी कढीपत्ता उपयुक्त आहे. त्यासाठी कढीपत्त्याची पातळ पेस्ट तयार करुन ती ताकात मिक्स करुन केसांना लावा.

curry leaves benefits for health | Social Media

वजन कमी करण्यासाठी

कढीपत्ता वजन कमी करतो. त्यासाठी कढीपत्त्याची पानं पाण्यात उकळून घ्या. हे पाणी गाळून घेऊन त्यात मध आणि लिंबाचा रस टाकून ते पाणी प्या.

curry leaves for weight loss | Social Media

वजन नियंत्रणात राहते

कढीपत्त्यामध्ये डिक्लोरोमेथेन, इथिल एसीटेट आणि महॅनिम्बाईन यासारखे आवश्यक घटक असतात. कढीपत्त्याच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

curry leaves for weight control | Social Media

मधुमेहासाठी फायदेशीर

सकाळी कढीपत्त्याचे 8 ते 10 पानं रिकाम्या पोटी चावून खा किंवा त्याचा रस प्या. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

curry leaves for diabetes | Social Media

पचनक्रिया सुधारते

कढीपत्त्याचा ज्यूस पचनक्रिये संबंधित समस्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. कढिपत्त्याच्या ज्यूस पाचक प्रणाली मजबूत करण्यासाठी मदत करतो.

curry leaves for Improves digestion | Social Media

हार्ट निरोगी राहते

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. कढीपत्त्याच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे हृदय निरोगी राहते.

curry leaves for heart | Social Media

NEXT: Air Conditioner: एसीचा अतिवापर केला तर होऊ शकतो स्फोट, अशी घ्या काळजी

Air Conditioner | Social Media