Manasvi Choudhary
मनुका हा एक प्रकारचा सुकामेवा आहे जो द्राक्षांपासून बनवला जातो.
लाल मनुके, पिवळे मनुके आणि काळे मनुके असे मनुक्याचे तीन प्रकार आहेत.
काळ्या द्राक्षांपासून काळे मनुके तर हिरवी द्राक्षे सुकवून त्याच्यापासून पिवळे मनुके बनवली जातात.
पिवळ्या मनुक्याला बेदाणे देखील म्हटले जाते.
काळे मनुके औषधी गुणधर्म म्हणून आरोग्यासाठी खाल्ली जातात.
मनुक्यामध्ये लोह, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात यामुळे निरोगी आरोग्यासासाठी नियमितपणे मनुक्याचे सेवन केले जाते.
काळे मनुके हे प्लम केक, ब्रेड आणि बन्स बनविण्यासाठी वापरले जाते.
शरद या जातीच्या द्राक्षांपासून काळे मनुके बनवली जाते.
काळ्या मनुकाचे सकाळी सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पिवळ्या मनुके चवीला गोड असतात तर पिवळे मनुकाच्या तुलनेत काळे मनुक्यामध्ये नैसर्गिक चव असते.