Ind vs NZ T20: शतकवीर गिलचे ७ मोठे रेकॉर्ड! विराटलाही धोबीपछाड

Gangappa Pujari

टीम इंडियाने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत मालिका खिशात घातली. सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक ठोकले.

Shubhman Gill | Saamtv

गिलने 14 डिसेंबर 2022 पासून सर्व तिन्ही फॉर्मेटमध्ये 5 शतकं झळकवली आहेत. या कालावधीत कुठल्याही फलंदाजाने झळकवलेली ही सर्वाधिक शतकं आहेत.

Shubhman Gill | Saamtv

शुभमन गिल तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा भारताचा पाचवा बॅट्समन आहे. त्याच्याआधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीने अशी कामगिरी केली.

Shubhman Gill | Saamtv

गिलने फक्त 63 चेंडूत 126 धावा चो पल्या. T20 मध्ये भारतासाठी हा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. गिलच्या आधी विराट कोहलीने अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 122 धावांची शतकी खेळी केली होती.

Shubhman Gill | Saamtv

शुभमन गिल T20 इंटरनॅशनलध्ये शतक झळकवणारा भारताचा सर्वात युवा फलंदाज आहे.

Shubhman Gill | Saamtv

गिल न्यूझीलंडविरुद्ध T20 मध्ये सर्वाधिक स्कोर करणारा फलंदाज बनला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड लेवीचा (नाबाद 117) धावांचा रेकॉर्ड मोडला.

Shubhman Gill | Saamtv

गिलच टी 20 इंटरनॅशनलमधील हे पहिलं शतक आहे. या फॉर्मेटमध्ये सेंच्युरी झळकवणारा तो भारताचा सातवा फलंदाज आहे

Shubhman Gill | Saamtv

NEXT: जुहू बीचवर धमाल, अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकरी घायाळ

Dhanashri Kadgaonkar | Saamtv