Gangappa Pujari
क्रिकेटपटू के एल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी आज विवाह बंधनात अडकत आहेत.
के एल राहुलआधी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केले आहे.
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या टस्कनी शहरातील बोर्गो फिनोशिटो रिसॉर्टमध्ये लग्न केले.
माजी क्रिकेटर युवराज सिंगने 30 नोव्हेंबर 2016 रोजी बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले.
चक दे इंडिया फेम अभिनेत्री सागरिका घाटगेने 24 एप्रिल 2017 रोजी क्रिकेटर झहीर खानसोबत लग्न केले.
अभिनेत्री गीता बसरा हिने भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगसोबत २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्न केले.
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांची 1 जानेवारी 2020 रोजी एंगेजमेंट झाली.