Indian Marriage Rituals | लग्नात मुंडावळ्या आणि बाशिंग का बांधतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्नात

लग्नात नवरा-नवरीला बांधल्या जाणाऱ्या मुंडावळ्या आणि बाशिंग यामुळे त्यांच्या रुपात भर पाडतात.

Indian Marriage Rituals | Canva

प्रकार

मुंडावळ्या आणि बाशिंग हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.

Indian Marriage Rituals | Canva

बाशिंग

बाशिंग हे थोडे मोठे असते. त्याच्या कपाळावरील पट्टीचा आकार हा एखाद्या मुकुटासारखा असतो. त्याच्यावर तुरा असतो. त्याच्या दोन कोपऱ्यांना मुंडावळ्यासारख्या सरी असतात.

Indian Marriage Rituals | Canva

मुंडावळ्या

मुंडावळ्यांचे प्रकार पाहता त्यामध्ये कपाळाला एक आडवी पट्टी येते. ती फुलांची, मोत्याची किंवा चैनची असते. त्या खाली लोंबकळणाऱ्या मोत्याच्या सरी असतात. त्याच्या शेवटी मोती किंवा गोंडा असतो.

Indian Marriage Rituals | Canva

मुंडावळ्या किंवा बाशिंग

मुंडावळ्या किवा बाशिंग बांधल्यानंतर नवरा किंवा नवरीच्या रुपाकडे पटकन लक्ष जात नाही. मुंडावळ्या आणि बाशिंग लक्ष वेधून घेतात. त्यामुळे त्यांना नजर लागत नाही.

Indian Marriage Rituals | Canva

डोकं शांत ठेवण्यासाठी

डोक्यावर पट्टी बांधल्यासारख्या मुंडावळ्या बांधल्यामुळे डोकं शांत राहण्यास मदत मिळते.

Indian Marriage Rituals | Canva

ताण कमी करण्यासाठी

जागरणामुळे आलेला ताण कमी करण्यासाठी त्या विशिष्ट जागी मुंडावळी बांधली जाते.

Indian Marriage Rituals | Canva

हळदीचा दिवस

लग्नात हळदीच्या दिवसापासून मुंडावळ्या बांधल्या जातात. खूप जणांकडे हळदीच्या दिवशी रुहीच्या फुलांच्या मुंडावळ्या लावल्या जातात तर काही ठिकाणी फुलांच्या देखील असतात.

Indian Marriage Rituals | Canva

बाशिंग

ज्यांच्याकडे बाशिंग बांधण्याची पद्धत आहे. त्यांच्याकडे मुलगा लग्नाच्या दिवशी बाशिंग घेऊन येतो. त्यावेळी मुलीला म्हणजे नवऱ्या मुलीला बाशिंग दिले जाते.

Indian Marriage Rituals | Canva

Next : Rupali Bhosale | वाऱ्यावर पदर उडाला, सौंदर्याचा चेहरा बहरला

Rupali Bhosale | Saam Tv