Satish Daud Patil
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे.
प्रत्येक संघांचे एक किंवा दोनच साखळी सामने बाकी असून प्लेऑफची फेरी गाठण्यासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सचा समावेश आहे.
हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने यापूर्वीच प्लेऑफच्या फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे.
पाचवेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात प्लेऑफची फेरी गाठण्यासाठी धडपडत आहे.
मुंबईच्या हातातून सध्या वेळ निघून गेली असून त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दुसऱ्या संघांवर आधारभूत राहावं लागतंय.
विशेष बाब म्हणजे मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला नाही.
चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्सचे १३ सामन्यात प्रत्येकी १५ गुण आहेत. दोन्ही संघांचा नेटरनरेटही चांगला आहे
चेन्नईचा सामना दिल्लीसोबत आणि लखनौचा सामना कोलकातासोबत होणार आहे.
या सामन्यांमध्ये लखनौ किंवा चेन्नई यांच्यापैकी कोणताही संघ पराभूत झाला तरी मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, त्यासाठी मुंबईला पुढचा सामना जिंकावा लागेल.