Jio Recharge : ११ महिने व्हॅलिडिटी, कॉलिंग, डेटा अन् बरंच काही, प्लान इतका स्वस्त की...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jio आपल्या यूजरसाठी अनेक प्लानची ऑफर देते. आता कंपनीनं खूपच स्पेशल प्लानची घोषणा केलीय.

Jio recharge | Jio/social media

जिओने ८९५ रुपयांचा रिचार्ज प्लान देऊ केला आहे. त्यात यूजर्सना ३३६ दिवसांची वैधता म्हणजे जवळपास ११ महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते.

Jio recharge | Jio/social media

इतकंच नाही तर, या खूपच स्वस्त प्लानमध्ये यूजर्सना कॉलिंग-डेटा आणि इतर फायदेही मिळतात.

Jio recharge | Jio/social media

जिओच्या ८९५ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना २४ जीबी डेटा मिळतो. मात्र, हा डेटा दर २८ दिवसांसाठी प्रत्येकी २ जीबी असेल.

Jio recharge | Jio/social media

याशिवाय यूजर्सना अमर्यादित वॉइस कॉलिंग सुविधा आणि २८ दिवसांसाठी ५० एसएमएस मिळणार आहेत.

Jio recharge | Jio/social media

जिओच्या या प्लानमध्ये यूजर्सना जिओ अॅप्स-Jio TV, Jio Cineme, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्युरिटीचा अॅक्सेसही मिळेल.

Jio recharge | Jio/social media

जिओच्या या प्लानचा लाभ केवळ जिओ फोन यूजर्सनाच मिळणार आहे. सामान्य यूजर्सना प्लानचा लाभ मिळणार नाही.

Jio recharge | Jio/social media

कंपनीचे काही प्लान केवळ जिओ फोन यूजर्ससाठीच असतात आणि ८९५ रुपयांचा प्लान त्यातीलच एक आहे.

Jio recharge | Jio/social media

डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्सना ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट मिळेल.

Jio recharge | Jio/social media

डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी या गोष्टी करा

depression | Saam TV