Baba Maharaj Satarkar: बाबा महाराज सातारकरांचा जीवनप्रवास...

Priya More

बाबा महाराज सातारकरांचं निधन

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं.

Baba Maharaj Satarkar | Social Media

खरं नाव

बाबा महाराज सातारकर यांचं खरं नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातार्‍यामध्ये झाला होता. (संदर्भ - मराठी विश्वकोष)

Baba Maharaj Satarkar | Social Media

इंग्रजी माध्यमातून शिक्षण

बाबा महाराज सातारकरांनी इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

Baba Maharaj Satarkar | Social Media

वारकरी संप्रदायातील प्रमुख फड

वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून बाबा महाराजच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते.

Baba Maharaj Satarkar | Social Media

135 वर्षांची परंपरा

बाबा महाराज सातारकरांच्या कुळामध्ये 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.

Baba Maharaj Satarkar | Social Media

८ व्या वर्षी अभंगाच्या चाली गायल्या

वयाच्या 8 व्या वर्षांपासून त्यांनी श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायला सुरूवात केली होती.

Baba Maharaj Satarkar | Social Media

खाँसाहेबांकडे घेतले धडे

वयाच्या 11 व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँसाहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली होती.

Baba Maharaj Satarkar | Social Media

कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी

बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त मोठ्यासंख्येने यायचे.

Baba Maharaj Satarkar | Social Media

इतर राज्यातही केलं कीर्तन

फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश अशा राज्यात कीर्तन – प्रवचनांचे शेकडो कार्यक्रम त्यांनी केले.

Baba Maharaj Satarkar | Social Media

परदेशातही ज्ञानेश्वरी प्रवचने

१९८६ साली लंडन येथे हिंदीतून चार प्रवचने केली. त्यानंतर अमेरिकेत बोस्टन, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, आरलँडो याठिकाणी १४ ज्ञानेश्वरी प्रवचने त्यांनी केली आहेत.

Baba Maharaj Satarkar | Social Media

NEXT: Kangana Ranaut: कंगनाचा बॉसी लूक पाहिलात का?, फोटोंनी केली जादू

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut