ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या मुंबईची मलीशा खरावा ही जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.
२०२० मध्ये हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅननं गाण्याच्या शूटिंगसाठी मुंबईत होते, यावेळेस त्यांनी मलीशाला शोधलं
14 वर्षाची मलीशा आता ‘द युवती कलेक्शन’ या ब्रँडचा चेहरा बनली आहे. या ब्रँडच्या प्रत्येक प्रोडक्टवर मलीशाचा फोटो आहे.
सोशल मीडिया मलीशा जबरदस्त अॅक्टिव्ह आहे.
मलीशाचे इन्स्टाग्रामवर २ लाख फॉलोवर्स आहेत. मलीशा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना मलीशा The Princess From The Slum या हॅशटॅगचा वापर करते. त्यामुळे मलीशाला ‘स्लम प्रिंसेस’या नावाने देखील ओळखले जाते.