Health tips: जेवणाआधी की नंतर, गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी

निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्या संबंधित नियम पाळणे फार गरजेचे आहे.

Health tips | canva

आवड

मात्र, आपण त्या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही. बऱ्याचदा आपल्याला जे पदार्थ आवडतात, त्या पदार्थांचे आपण बिनधास्त सेवन करतो.

Health tips | canva

योग्य वेळ

जेवणाआधी की नंतर गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?

Health tips | canva

गोड कधी खाणे?

जेवणापूर्वी गोड पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. कारण गोड पदार्थ हे पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जेवणापूर्वी त्याचे सेवन केल्याने पाचक स्त्रावांचा प्रवाह वाढतो. त्यामुळे गोड हे जेवणापूर्वी खाणे योग्य ठरते.

Health tips | canva

टेस्टबड्स अॅक्टिव्ह होण्यास होते मदत

जेवणापूर्वी गोड पदार्थ खाल्ला तर तुमचे टेस्टबड्स अॅक्टिव्ह होण्यास मदत होते आणि यामुळे तुम्ही जेवणाचा अधिक चांगला आनंद घेऊ शकता. त्यामुळे जेवणापूर्वी गोड खाणे फायदेशीर ठरते.

Health tips | canva

हार्मोन्स सक्रिय होतात

शरीरात ज्याप्रमाणे विविध प्रकारचे हार्मोन्स असतात, त्याप्रमाणे अन्न पचवणारे देखील हार्मोन्स असतात. जेवणापूर्वी जर तुम्ही गोड खाल्ले तर तुमच्या शरीरातील अन्न पचवणारे हार्मोन्स सक्रिय होण्यास मदत होते.

Health tips | canva

पचनक्रिया मंदावते

पचनक्रिया योग्य असणे फार गरजेचे असते. कारण पचनक्रिया चांगली असेल तर आपले आरोग्य देखील उत्तम राहते. त्यामुळे जेवणानंतर कधीही गोड खाण्याचा आनंद घेऊ नका. याचा तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो आणि ती मंदावते.

Health tips | canva

पोटात गॅस होण्याची समस्या

जेवणानंतर गोड खाल्ल्याने तुमच्या पोटात गॅस होण्याची समस्या वाढते आणि तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटते.

Health tips | canva

NEXT: Health Tips| रात्रीच्या जेवणात चपाती का खाऊ नये?

Health Tips | Saam Tv