Weight Gain: मासिक पाळीत महिलाचं वजन का वाढतं? कारण आजच जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी

मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक समस्याना सामोरे जावे लागते.

menstrual cycle | Canva

समस्या

मासिक पाळीदरम्यान पोट दुखी, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मूड बदलणे, वजन वाढण्यासोबतच चिडचिडपणा वाढणे यासारख्या समस्या जाणवतात.

menstrual cycle | canva

वजन वाढ

मासिक पाळीच्या दरम्यान वजन वाढणे ही एक सामान्य गोष्ट आहे, जे पाळी संपल्यावर स्वत:हून कमी होते,असे का होते हे जाणून घेऊया.

menstrual cycle | canva

वॉटर रिटेन्शन

मासिक पाळीमध्ये महिलांच्या प्रजनन हार्मोन्सची पातळी वाढते. याकाळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे पाणी टिकून राहते म्हणजेच शरीराच्या अवयवामध्ये पाणी साचते. त्यामुळे शरीरात साठलेल्या पाण्यामुळे वजन वाढते.

menstrual cycle | canva

हार्मोन्स

मासिक पाळीमध्ये महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन अधिक वाढते, त्यामुळे थोडेसे अन्नही शरीरात द्रवपदार्थ टिकून ठेवू शकते. त्यामुळे महिलांनाही फुगल्यासारखे वाटते.

menstrual cycle | Canva

अधिक भूक लागणे

शरीरात प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढल्यामुळे महिलांना अधिक भूक लागते. यामुळे त्याना या काळात अधिक चवदार पदार्थ खावेसे वाटतात. तसेच या दिवसांमध्ये शारीरिक हालचाल कमी असल्याने वजन वाढू शकते.

menstrual cycle | canva

पचनाच्या समस्या

मासिक पाळीदरम्यान शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढल्यामुळे पोट फुगळ्यासारखे होते. याकाळात महिलांना बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या समस्या उद्भवतात आणि वजन वाढते.

menstrual cycle | canva

NEXT: First Periods| पहिल्यांदा मासिक पाळी आल्यास 'अशी' घ्याल काळजी

First Periods | Social Media