खराब ATM मुळे बनला करोडपती! 10 हजारांऐवजी मिळाले 9 कोटी

साम टिव्ही ब्युरो

एटीएमधील टेक्निकल एररमुळे ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला ९ कोटी रुपये मिळाले.

विशेष म्हणजे बँकेला याबद्दल काहीही माहिती नव्हतं. पाच महिन्यात या व्यक्तीने सर्व पैसे मौजमस्ती करत संपून टाकले.

डॅन सांडर्स हा व्यक्ती एटीएममध्ये १० रुपये काढण्यासाठी गेला होता.

त्यानंतर एटीएममधून त्याला पैसे मिळाले आणि ते त्याच्या खात्यातून कट देखील नाही झाले.

त्यानंतर त्याने पुन्हा काही पैसे काढले आणि त्याला पैसे मिळाले पण त्याच्या खात्यातून कट झाले नाही.

असं करत त्याने बँकेतून तब्बत ९ कोटी रुपये काढून घेतले.

डॅनने त्यानंतर बँकेत चौकशी करुन काही गडबड तर झाली नाही ना हे देखील तपासून पाहिलं.

तब्बल तीन वर्षांनंतर पोलिसांनी याप्रकरणी त्याला अटक केली.

NEXT: चुकूनही या व्यवहारांसाठी Credit Card वापरु नका

Credit Card