Satish Daud Patil
मराठी अभिनेत्री मानसी नाईक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसीला ओळखले जाते.
‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे मानसी नाईक घराघरात पोहोचली.
मानसी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरसुद्धा आहे.
मानसी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते.
नुकतेच मानसीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर पोष्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये मानसी नाईक खूपच सुंदर दिसत आहे.
मानसी नाईकच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मानसी सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.