Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
गौरीनं 'स्वप्नांच्या पलीकडे' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं.
मालिकेसह चित्रपटातील अभिनयानं गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहतावर्ग आहे.
नुकतेच गौरीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो तिने समुद्र किनाऱ्यावर बसून ‘सन किस’ करत हे खास फोटोशूट केलंय.
पांढऱ्या कलरच्या ड्रेसवर फुलांची डिझाईन असून त्यावर न्यूड मेकअप करत फोटोशूट केले.
फेसाळणाऱ्या समुद्राचा आनंद लुटत गौरी सुर्यास्ताचा अनुभव घेतेय.
गौरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.