Satish Daud Patil
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव कायमच आघाडीवर असते.
प्राजक्ता माळीने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते, ती आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
प्राजक्ताच्या फोटोंना तिचे चाहते देखील मोठा प्रतिसाद देत असतात.
नुकतेच प्राजक्ता माळीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ताने कलरफूल साडी परिधान केली आहे. चाहत्यांना तिचा लूक खूपच आवडला आहे.
प्राजक्ता इतके सुंदर फोटो शेअर नको करू, कामात मन नाही लागत, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने तिच्या फोटोंवर दिली आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.